फोन बाॅम्ब मलिक देवेंद्र आणि मुंडे

देवेंद्र फडणवीसांचं पेन ड्राईव्ह प्रकरण अजूनही सुरु आहे. पेन ड्राईव्हच्या माध्यमातून धडाकेबाज आरोप होतं आहेत आणि त्यातून बाॅम्ब आता फुटू लागेल आहेत. फडणवीसांकडून एक एक आरोप बाहेर पडत आहेत , मात्र हे आरोप बाहेर यावे यासाठी कोण कोण उत्सुक होतं. हे देखील पाहण महत्वाचं आहे. सातत्याने नारायण राणे , निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. त्यात पवारांचे संबंध दाऊदशी जोडल्यावरच हे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणात दाऊदशी पवारांचा संबंध कसा आहे यासाठीचा एक पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना पुराव्यानिशी सादर केला. यात सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा ऑडिओ आणि व्हिडीओ कैद झालेलं एक फुटेज त्या पेन ड्राईव्हमध्ये आहे.

अल्पसंख्यांक विभागाकडून राज्याच्या वक्फ बोर्डावर सदस्यांची नियुक्ती होत असते. या नियुक्ती संबंधीत मंत्र्यांच्या संमतीने होत असतात. नवाब मलिक यांनी डाॅ.मुद्तसीर तांबे यांची वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. या नियुक्ती बाबत काय घडलं हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट पणे जाहीर केलं . तांबे यांचे थेट दाऊदशी संबंध आहेत. हे फडणवीस सांगताय किंवा कोणी आरोप करतय म्हणून नाही तर तांबे स्वतः फोन संभाषमातून जाहिर करत आहेत. हेच संभाषण फडणवीसांनी सादर केलं आहे. आता यावर अनेक विरोधी आरोप करतील काॅल रेकाँर्डींग मिळाली कशी पण ते कुठुन आलं यापेक्षा जे बाहेर आलं ते फार भायंकर आहे.

ज्यांचे दाऊदशी संंबंध आहेत ते अशा प्रकारे उघड पडतांना दिसत आहेत. याप्रकरणी समजून घेतांना लक्षात येईल. की, डाॅ.मुद्तसीर तांबे यांचे एका महिले सोबत संबंध होते. महिलेचा आरोप आहे की, तांबेनी माझ्यावर अत्याचार केले आहेत. 28 जानेवारी 2020 रोजी हि घटना घडली असून तांबे या महिलेचं भलं करतील अशी अपेक्षा ठेवून ती महिला शांत राहीली. नंतर ऑक्टोबर 2020 साली या महिलेने अधिकृत तक्रार केली. या भूमिकेनंतर त्या महिलेच्या पतीला चोरीच्या खोट्या आरोपात तुरुंगात टाकण्यात आलं. या सर्व प्रकरणाचे पुरावे फडणवीसांनी दिले आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांना महिलांविषयी काहीही असेलल्या तक्रारीला महत्व द्यायच नाही अशी सवय आहे. मात्र तांबे विषयीच्या प्रकऱणी का एवढं हे घाबरताय हा प्रश्न निर्माण होतं आहे. डाॅ. तांबे यांचे थेट संबंध दाऊदशी आहेत हे स्पष्ट होतं. पण तांबेची नियुक्ती नवाब मलिकांनी केलेली आहे हे देखील स्पष्ट आहे. मलिकांचे संबंध शरद पवारांशी आहेत .

देवेंद्र फडणवीसांनी हे सगळ प्रकरण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मांडल आणि हा सगळा प्रकार सभागृहात उघड झाला आहे. त्यामुळे नवाब मलिकांचे दाऊदशी कसे संबंध आहेत हे स्पष्टपणे समोर आलं आहे. ही सर्व चर्चा अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटच्या सत्रात सुरु होती. त्याआधी जयंत पाटील हे सभागृहात काही मुद्दे मांडत मात्र त्यांच्या मागून धनंजय मुंडे खाणाखुणा करतांना दिसले आहेत. त्यानूसार ते काही तरी इशारा करत आहेत असं म्हंटल गेलं . धनंजय मुंडे विचारत होते की फोनचा  बाॅम्ब कधी आहे ? आजच आहे का ? अश्या खाणाखुणा करताना ते त्यांनी आपले स्वतःचे दंड थोपाटले. त्या मागचा इशारा म्हणजे की मी पण करू शकतो किंवा मी पण दाखवतो काय आहे ते. यासर्व प्रकरणात कदाचित धनंजय मुंडेंना माहित होतं का असा सवाल निर्माण होतो . म्हणजे विरोधीपक्षाला ते बोलत होते ते याच संदर्भात होतं का असा देखील प्रश्न आहे. आणि हाच विषय असेल तर कोण माहिती पुरवत हे देखील तपासण महत्वाचं आहे.

 

 

Share