हौसले ज़िंदा है… कोर्टाने निर्णय देताच मलिकांचं ट्विट

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांना ईडीने मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आपली अटक बेकायदेशीर असल्यांच सांगत मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाई विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायलयाने मलिकांची याचिका फेटाळून लावली आहे.  न्यायालयाने दणका दिल्यानंतर मलिका यांच्या कार्यालयाच्या वतीने ट्वीट करण्यात आलंय.

नवाब मलिक यांच्या कार्यालयामार्फत ट्विट प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “रुकावटे है ज़रूर पर हौसले ज़िंदा है, हम वोह है जहा मुश्किलें शर्मिंदा है. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य आणि न्यायाचा विजय होईल!,” अशी प्रतिक्रिया नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

नेमक प्रकरण काय?
अंमलबजावणी संचालनालयाने दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यांना २३  मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्या मालकीची जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी ३०० कोटींची जमीन केवळ ५५ लाखांना खरेदी केल्याचा आरोपही आहे. या संपूर्ण व्यवहारात मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. यासोबतच अंडरवर्ल्ड आणि १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध असून मालमत्ता खरेदी केल्याचाही आरोप आहे. ईडीने मलिक यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप केला आहे.

 

Share