औरंगाबादचं संभाजीनगर नामांतरासाठी मुनगंटीवार आक्रमक

मुंबई- भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी आक्रमक पवित्रा उचलेला बघायला मिळाला आहे. या कामासाठी केंद्र सरकारची काही मदत लागत असेल तर मी स्वत: सोबत येईल असे आश्वसन देत औरंगाबादचं नाव बदलून लवकरात लवकर संभाजीनगर करावं अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली आहे .

यावेळी बोलताना आपल्यासाठी काही लोक प्रेरणा देणारे असतात. उर्जा देणारे असतात. यापैकी एक म्हणजे छत्रपती संभाजीराजे महाराज हे आहेत. आज त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. या निमित्ताने मी त्यांचे स्मरण करतो. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं. नाव बदलण्यासाठी एक प्रोसोस असते. ही पूर्ण प्रोसेस ४ मार्च २०२० रोजी पूर्ण झाली. आपण अनेक नावं बदलले. विमानतळाचे नाव बदलले. दिल्लीत औरंगजेब मार्गाचे डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम असे करण्यात आले. म्हणून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पद खुर्च्यांसाठी महाराज कधीच लढले नाहीत असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला तसेच प्रस्ताव तयार असताना देखील नाव न बदलने हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे तुम्हाला केंद्राकडून वाट्टेल ती मदत करायला मी तयार आहे पण तुम्ही नामांतर त्वरीत कार असं मुनगंटीवार भाषणावेळी म्हणाले .

Share