बारावी बोर्डाचा पेपर फुटला, विद्यार्थ्याच्या फोनमध्ये आढळली प्रश्नपत्रिका

मुंबई – मुंबईत बारावी बोर्डाचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यात गणिताचा पेपर फुटल्याच वृत्त बाहेर आलं आहे.  काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये प्रश्नपत्रिका आढळली आहे. या प्रकरणी शिक्षकांनी मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका आणि प्रत्यक्षात आलेली प्रश्नपत्रिका एकच असल्याच म्हंटल आहे.

दरम्यान या दोन्ही ठिकाणच्या पेपर फुटीमुळे एकच चर्चा सुरु आहे. मुंबईतील पेपर फुटी प्रकरणी विलेपार्ले येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील चौकशी करणार आहे. प्रश्नपत्रिका फुटल्याने शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी पालकांकडून केली जात आहे. यापूर्वी अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील काही ठिकाणी पेपर फुटल्याची तक्रार सोशल मीडियावर केली होती. प्रश्नपत्रिकेचे फोटो अनेक अ‍ॅप्सवर व्हायरल झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

 

 

 

Share