दिवाळीआधी मुंबईतून ३०० किलो भेसळयुक्त तूप जप्त

मुंबई : दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. १८/१०/२०२२ रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील .मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊनपहिला मजला१५श्रीनाथजी बिल्डिंगकेशवजी नाईक रोडचिंचबंदरमुंबई-९येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषनासाठी घेऊन उर्वरित ४०० किलोकिंमत रु. २,९९,०९०/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असूनविश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षितआरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

Share