८० लाख घरे तर, ६० लाख नवीन नौकरीच्या संधी !

दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आजच्या अर्थसंकल्पात ६० हजार नागरिकांना रोजगार आणि ८० लाख देशातील नागरिकांना घरं बांधून देणार असल्याचं म्हंटलं आहे. यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद देखील केली असल्याच त्यांनी म्हंटल आहे.

पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद

शहरी आणि ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय आणि गरिबांना परवडणारी घरं मिळावीत यासाठी खासगी बिल्डरांशी चर्चा करणार असून मध्यस्थांमुळे वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ८० लाख घरं बांधणार आहोत.

लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील-

देशातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामधून देशात ६० लाख नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

Share