देशात पुढील तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार 

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली.  यावेळी त्यांनी देशात पुढील तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु करणार असल्यांची घोषणा केली आहे. देशभरात रेल्वेचा जाळं मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. पुढच्या तीन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे सुरु होणार आहेत. शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Share