MPSC परीक्षा निकाल जाहीर; प्रवीण बिराजदार राज्यात पाचवा

लातूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उजेड ( ता. शिरूर अनंतपाळ) येथील रहिवासी प्रवीण सोमनाथ बिराजदार याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. प्रवीण बिराजदार यानेराज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षामध्ये महाराष्ट्र राज्यातून गुणानुक्रमे पाचवा क्रमांक मिळवला. त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन या विभागात वर्ग १ पदी निवड झाली आहे.

प्रवीण याचे प्राथमिक शिक्षण उजेड येथे तर माध्यमिक शिक्षण श्री देशिकेंद्र विद्यालय लातूर व महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून पूर्ण केले. तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून सिव्हील इंजिनिअरिंग पदवी संपादन केली आहे. प्रवीणने महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही परीक्षा २०२० मध्ये दिली आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल उजेड येथे गावकऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Share