मुंबई : शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिदे हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. महाविकास आघाडी सरकार संकटात आले असतानाच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटलं की, ‘शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.’ असं ट्विट राणे यांनी केले आहे. आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान आहेत. दिघे यांचे नाव घेत राणे यांनी या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांना भावनिक आवाहन केल्याचं मानलं जात आहे.
शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 21, 2022
शिवसेनेचे एकूण ३५ आमदार शिंदेसोबत असल्याचा दावा गुजरातमधील भाजपा नेत्यांनी केला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदार सूरतमध्ये असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता हा आकडा वाढत आहे. हा आकडा अतिशय मोठा असून भाजपचा हा दावा खरा असल्यास हा शिवसेनाला जबर धक्का असेल.