मुंबई- सुप्रीम कोर्टाच्य़ा आदेशानूसार भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्यात आलं आहे. यावर आता राज्यातलं राजकारण चांगलच तापलं आहे. न्यायालयाच्या निर्णयात म्हंटल आहे की,हे निलंबन असंवैधानिक तसंच बेकायदेशीर असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. तसंच निलंबन करायचं होतं तर ते फक्त एका अधिवेशनापुरतंच असायला हवं होतं असेही ताशेरे ओढले आहेत . यावर मविआ आणि भाजपात उत्तर प्रत्युत्तराच्या मालिका सुरु झाल्या असून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या वादात आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही उडी घेत उर्मिला मातोंडकर यांच्यावर खोचक टिका केली आहे.
केशव उपाध्ये यांनी मातोंडकारांच्या ट्विटला उत्तर देत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे. थोडी माहिती घ्या आपल वाचन चांगल आहे अस ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदारकीचा विषय तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितल नाही.
आपली जळजळ, तळमळ ही केवळ 'आमदारकी'साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील 'प्रतिक्रियावादी' भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा. https://t.co/pGMPTvyXil
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 28, 2022
आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील ‘प्रतिक्रियावादी’ भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा. असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.