हिवाळ्यात डाळिंब खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ईचक दाना, बिचक दाना दाने ऊपर दाना, ईचक दाना’ डाळिंबाचे वर्णन करणारे हे गाणे आपल्या तोंडात चांगलंच बसले आहे. डाळिंबाचे पारदर्शक रसाळ दाणे लाल माणकांसारखे दिसतात. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली येथे जास्त प्रमाणात डाळिंबाची पिके घेतली जातात. डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नाव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळे या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ

डाळिंब खाण्याचे फायदे

  • चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
  • अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
  •  शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
  •  घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.
  • यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी
  • मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्तपडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा.
  • ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
  • डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अ‍ॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
  • अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
  •  जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
  •  डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
  • बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
  •  हृदय बळकट करण्यासाठी डाळिंबाच्या रसात केशर, लाल गूळ व वेलची घालून त्याचे सरबत करावे व रोज थोडे थोडे प्यावे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील अडथळा दूर होऊन रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
  • डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने जुनाट खोकला नाहीसा होतो.
  • पण डाळिंब सोलल्यानंतर त्याचे दाणे लगेचच खाणे आवश्यक आहे कारण दाणे उशिरा खाल्यानंतर त्यातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होते. त्याचप्रमाणे स्वाद व चवही कमी होते.
Share