सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरुच; ‘या’ दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात खांदापालट करण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची नियुक्ती करण्याती आली आहे. तर पक्ष कारवाया केल्याप्रकरणी नवी मुंबईतील विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

गुरुवारी या दोघा नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजय चौगुले हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. विजय नाहटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत. या दोघांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने पक्षातून हकालपट्टी केल्याचे सामना वृत्तपत्रातून जाहीर केलं आहे.

दरम्यान, ठाणे, नवी मुंबईनंतर कल्याण-डोंबिवलीमध्येही नगरसेवकांनीही शिंदेच्या सोबत राहण्यास पसंती दिल्याने शिवसेनेची स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे पक्षाकडूनही आता कडक निर्णय घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेना नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Share