मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी ९ जुलै रोजी पुणे येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत. रात्री पंढरपूर येथे रात्री ११.३० वाजता त्यांचे आगमन होणार आहे.  रविवारी मध्यरात्री अडीच ते पहाटे साडेचार या वेळीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होईल. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता विठ्ठल मंदिर परिसरातील इस्कॅान आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमिपूजन होईल. नंतर पहाटे पावणे सहा वाजता चंद्रभागा नदी घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सकाळी सव्वा आकरा वाजता पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील सुंदर माझे कार्यालय या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर पावणे बारा वाजता पंचायत समिती पंढरपूर येथे ‘स्वच्छता दिंडी’ या कार्यक्रमाच्य समारोपास उपस्थित राहतील त्यानंतर साडे बारा वाजता पंढरपुरात होणाऱ्या पक्ष मेळाव्यास उपस्थित राहतील.

Share