मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे ऑनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. अन्नाची चव वाढवण्यासाठी आपण मेथीदाण्याचा वापर करतो,परंतु याचे आरोग्याचे आणि सौंदर्याचे फायदे जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य होईल.चला तर मग जाणून घेऊ या.
मेथी चे फायदे
- दररोज मेथीदाण्याची पूड खाल्ल्याने आपले वजन नियंत्रणात राहते.चरबीचे प्रमाण देखील हळू हळू कमी होते. अशा प्रकारे आपण आपले वजन देखील कमी करू शकता.
- मेथी दाण्याच्या नियमित सेवनाने हृदय रोग दूर राहण्यास मदत होते.या मुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते आणि आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.
- मधुमेहाच्या रुग्णांना मेथीचे दाणे खूप फायदेशीर असतात.दररोज रात्री भिजवून ठेवावे आणि सकाळी चावून खावे आणि पाणी पिऊन घ्यावे.
- केसांच्या सौंदर्यासाठी मेथीचे दाणेही फायदेशीर आहेत.पेस्ट बनवून केसांवर लावल्याने केसांचा रुक्षपणा नाहीसा होतो,तसेच केस देखील मजबूत होतात.
- चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मेथीदाणे प्रभावी आहे.याची पेस्ट बनवून लावल्याने त्वचा घट्ट होऊन त्यात चमक येते.या शिवाय हे कोरड्या आणि रुक्ष त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.कारण हे त्वचेला ओलावा देतो.