‘नॉटी नामर्द, बिगड़े नवाब…’,अमृता फडणवीसांची हटके टिका

नागपूरः  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. या वेळेस त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली आहे. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले अशा आशयचे जळजळीत ट्विट अमृता फडणवीसांकडून करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून राजकारणात नॉटी हा शब्द खूप गाजत आहे, त्यातच संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हजेरीवरून विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नामर्द असतील अशी घणाघाती टीका केली होती. त्याला अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही नेहीमीच भाजपवर टीका करण्यात आघाडीवर असतात. दोन दिवसांपूर्वीच नवाब मलिकांनी किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल असल्याची टीका केली होती, त्यांना बिगडे नवाब म्हणत अमृता फडणवीसांनी निशाणा साधला आहे. तर मोदींबाबतच्या वक्तव्याच्या वादानंतर नाना पटोले भाजपच्या टार्गेटवर आहेत, काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंवरही निशाणा साधला होता. त्यांनी आता पुन्हा आक्रमक ट्विट करत नाना पटोलेंना टार्गेट केले आहे.

 

डक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे. त्यात पुढे…Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले …..या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? अशी जळजळीत टीका करण्यात आली आहे. त्याच ट्विटमध्ये पुढे…रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! म्हणत,_____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है औरसुनने में आया है _____नामर्द है ! असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे, त्यामुळे त्यांना आता महाविकास आघाडीकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे.

 

Share