‘यांना कानाखाली नाही मारायची मग काय पुजा करायची ?’ ‘त्या’ वक्तव्यावर राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : काल मुंबईत शिवसेनेचा गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर चांगलीच टीका केली आहे. मात्र यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एक मे शिवजयंती असा उल्लेख केला होता. यावरून भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणातील चुकीचा हा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यांना कानाखाली नाही मारायची मग काय यांची पुजा करायची? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

 

 

दरम्यान, दुसरीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधाला आहे. बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांची खुर्ची खाली होती. यावरून संदीप देशपांडे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ‘उद्या तुमचीही खुर्ची खाली असेल तयारी ठेवा’ असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Share