राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केल्याने आव्हाड यांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव  या सिनेमाच्या वादावरुन आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर २४ तासांच्या आतच आव्हाडांना जामीन मंजूर झाला आहे.

काय आहे प्रकरण?

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत राज्यभरातील काही संघटनांनी विरोध केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो राज्यभरातील चित्रपटांमध्ये दाखवू नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी या शो बंद पाडले होते. ठाण्यातही जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली होती. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती.

Share