राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख?

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केल्याने मोठा वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपात भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी  ट्वीट केला आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्वीट म्हणतात, राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा एकेरी उल्लेख केला, असं मिटकरी म्हणाले आहेत. राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय ? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करतील का?, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केलाय.

राज्यपालांचं नेमकं वक्तव्य काय?
राज्यपालांनी हिंदीत याबाबत एक वक्तव्य केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. “सब लोग कहते हैं की शिवाजी होने चाहीए, चंद्रशेखर होने चाहीए, भगतसिंह होने चाहीए, नेताजी होने चाहीए, लेकीन मेरे घरमें नही तो दुसरे के घरमे होने चाहीए”, असं विधान राज्यपाल संबंधित व्हिडीओत करताना दिसत आहेत.

Share