‘अश्वत्थामा – द सागा कंटिन्यूज’; Shahid Kapoor

पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली शाहिद कपूरच्या आगामी ‘अश्वत्थामा – द सागा कंटिन्यूज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा जॅकी भगनानी आणि शाहिदने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. याआधी हा चित्रपट शाहिद‌ऐवजी विकी कौशल करणार होता. विकीनेही या चित्रपटाची तयारी सुरू केली होती. पण नंतर तो चित्रपटातून बाहेर पडला. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन रवी असतील. वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख या चित्रपटाचे निर्माते आहेत. निमति ‘अश्वत्थामा…’ अशा स्टाइलमध्ये बनवण्याची योजना आखत आहेत जी यापूर्वी कधीही पाहिलेली नसेल. हा एक अखिल भारतीय चित्रपट असेल, जो हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल. काही काळापूर्वी निर्मात्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते की वाशू आणि जॅकी भगनानीचा हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून ते हा प्रकल्प विकसित करत आहेत. निर्मात्यांना असे काहीतरी व्हिज्युअल दाखवायचेत जे भारतीय प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. प्रोजेक्टच्या सुरुवातीपासूनच शाहीद कपूरला निर्मात्यांची पहिली पसंती होती. दिग्दर्शक आदित्य धर सुरुवातीला हा चित्रपट बनवणार होते. पण बजेटच्या अडचणींमुळे निर्मात्यांनी चित्रपट थांबवला. यात अनेक बड्या लोकांना कास्ट करण्याचा विचार निर्मात करत होते. शाहिद अलीकडेच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात कीर्ती सेननसोवत दिसला होता.

अश्वत्थामाचा जन्म द्वापारयुगात झाला. तो गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र होता. द्वापारयुगातील सर्वोत्तम योद्ध्यांमध्ये त्याची गणना होते, जो शास्त्र आणि शस्त्रास्त्रांमध्ये पारंगत होता. महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने गुरू द्रोणाचार्यांना मारण्यासाठी अश्वत्थामा मारल्याची बातमी पसरवली. त्यावेळी अश्वत्थामा हे हत्तीचे नाव होते. ही बातमी ऐकून गुरु द्रोणाचार्य स्तब्ध होऊन जमिनीवर बसले आणि त्या संधीचा फायदा घेत धृष्टद्युम्नने द्रोणाचार्यांचा वध केला. यामुळे व्यथित होऊन जेव्हा अश्वत्थामाने पांडव पुत्रांचा वध करून अभिमन्यूच्या पुत्राचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा वापर केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळातील रत्न काढून त्याला युगानुयुगे पृथ्वीवर भटकण्याचा शाप दिला. तेव्हापासून असे मानले जाते की अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे.

Share