माघी एकादशी निमित्त पंढरपूरात तीन लाखाहून अधिक भाविक

पंढरपूर- माघी एकादशी निमित्त  राज्यातून जवळपास तीन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्शवभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्याच्या सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे  सहा वारीवर निर्बंध लागू होते. मात्र, करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने कार्तिकी यात्रा भरली होती. मात्र  त्यानंतर  राज्यात कोरोना  बाबतचे अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे माघी वारीसाठी प्रशासनाने सोयी सुविधे बरोबरच आरोग्य सेवा देखील पुरवली आहे. मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना चहा,पाणी,फराळ  तसेच आरोग्य सेवा मोफत पुरविल्या आहेत. त्याच बरोबर दर्शन रांगेतील भाविकांनी मास्क, सॅनिटायझर बंधनकारक केले आहे.

Share