आयपीएल लिलाव सुरु असताना धक्कादायक घटना

IPL 2022 : टाटा आयपीएल च्या १५ व्या सीजनसाठी बँगलोर येथे सध्या महा लिलाव सुरु आहे. दुपारी १२ वाजल्यापासून ऑक्शनला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २५ ते ३० खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. लिलावा दरम्यान लिलाव पुकारणारे ह्यू एडमीड्स चक्कर यऊन खाली कोसल्याची घटना घडली. ज्यामुळे आयपीएलचे मेगा ऑक्शन तात्पुरतं थांबवण्यात आले.

आयपीएलच्या १५ व्या पर्वासाठीच्या दोन दिवसीय लिलावाची आजपासून बंगळुरु येथे सुरुवात झाली. आज या मेगा ऑक्शनचा पहिला दिवस आहे. दरम्यान, श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ऑक्शनर ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळं ऑक्शन थांबवण्यात आलं. सध्या ऑक्शन थांबवण्यात आले असून लंचची घोषणा करण्यात आलीय. ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर आहेत. त्यांचं वय ६३ आहे.

इतका मोठा लिलाव कधी केला नाही : एडमीड्स
लिलावापूर्वी एडमीड्स क्रिकेट डॉटकॉमसोबत बोलताना म्हणाले होते की, मी इतका मोठा लिलाव कधीच केलेला नाही. आयपीएलचा लिलाव खूप वेळ चालतो. लिलावासाठी माझ्या आत कुठून इतकी उर्जा येते हे मला माहीत नाही. दोन दिवसांच्या लिलावानंतर, १४ फेब्रुवारीला लंडनला परतताना मी चांगली झोपन घेईन.

यपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ६०० खेळाडूंवर लागणार बोली
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. बीसीसीआयनं यात १० खेळाडूंचा समावेश केलाय. ज्यामुळं ५९० ऐवजी ६०० खेळांडूवर बोली लावली जाणार आहे. आतापर्यंत एकूण २४ खेळाडूंचं ऑक्शन झालंय. त्यापैकी २० खेळाडूंना फ्रँचायझीनं खरेदी केलंय. तर, ४ खेळाडू अनसोल्ड ठरले आहेत.

Share