मका खाण्याचे आरोग्यदायी फायदे

कॉर्न, पॉपकॉर्न, स्वीट कॉर्न चाट, कॉर्न सूप, कॉर्नसह पास्ता इत्यादी हे सर्व आता आपल्या स्नॅक्सचा एक भाग बनला आहे. देशाच्या बर्‍याच भागात त्याला मका किंवा कॉर्न असेही म्हटले जाते, जे अन्नाचा मूलभूत स्रोत आहे. मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेले मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. फक्त स्नॅक्स म्हणून नाही तर मका खाण्याचे शरीराला बरेच फायदे होतात.
हाडे बळकट होतात

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते
मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबर्स असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

हाडे बळकट होतात
मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते. आर्थराइटिस आणि ऑस्टियोपोरोसिस यापासून संरक्षण होते.

शरीराला ऊर्जा मिळते
मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.

दृष्टी सुधारते
मका तुमच्या डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे तुमची दृष्टी सुधारते.

पोटाच्या समस्यांना आळा बसतो
अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

कर्करोगाचा धोका कमी करते
कॉर्नमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स कर्करोगाचा धोका कमी करतात.

वजन कमी करण्यासाठी
आपण वजन कमी करू इच्छित असल्यास, आपल्या आहारात कॉर्न फ्लेक्स समाविष्ट करा. हे आपल्या शरीरात कॅलरींचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे वजन सहजतेने कमी होते. मध, केळी, स्ट्रॉबेरी, सफरचंद इत्यादी फळांसह कॉर्न फ्लेक्स आपल्यासाठी आरोग्यासाठी स्नॅक्स ठरू शकतात.

Share