मलिकांच्या अटकेवर बोलण्यास समीर वानखेडेंचा नकार !

मुंबई-  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक करत ३ मार्चपर्यंत न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे मलिकांमुळे अडचणीत आलेले समीर वानखेडे कोपरी पोलिस ठाण्यात हजर झाले होते. पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला या दरम्यान त्यांनी ठाण्यात कागदपत्रे सादर केली आहेत. चौकशीला सहकार्य करत आहे. पुढेही बोलावले की सहकार्य करेन, असे सांगितले. तसेच नवाब मलिक यांना अटक झाल्याचे पत्रकारांनी विचारताच त्यांनी यावर उत्तर देण्याचे टाळत निघून गेले.

नवी मुंबईतील सद्गुरू बार परवाना प्रकरणी ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी वानखेडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. यानुसार वानखेडे हे आज कोपरी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सुमारे साडे सात तास त्यांची चौकशी सुरु होती.

कोपरी पोलिसांनी समीर वानखेडे यांचा ५ ते ६ पानी जबाब जबाब नोंदवला आहे. समीर वानखेडे यांनी पोलिसांना सहकार्य केले. जे काही प्रश्न विचारले त्यावर समीर वानखेडे यांनी उत्तरे दिली आहेत. आवश्यकता वाटली तर वानखडे यांना पुन्हा बोलावण्यात येईल. गुन्ह्याच्या तपासात जे काही सिद्धी होईल त्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे, असे कोपरी पोलिसांनी सांगितले.

Share