नवाब मलिकांना वाचवण्याची सरकारची भूमिका दुर्दैवी : फडणवीस

नागपूर-  अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने ३ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांचे संबंध दाऊदशी असल्याने एका देशद्रोही व्यक्तशी संबंध ठेवणाऱ्या मंत्र्याला सरकार वाचवत आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण दुर्दैवी आहे.  कुठल्याही राजकीय पक्षाने ‘टेरर फंडिंग’चा निषेध केला पाहिजे. सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले आहेत. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेश जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय, असे फडणवीस म्हणाले.

सध्या मलिकांच्या अटकेवरून राजकारण चांगलच तापलेलं आहे. यावरूनच फडणवीस यांनी सरकारववर जोरदार हल्लाबोल चढवत ही अटक कायदेशीर आहे. जमिनीच्या मालकी असलेल्यांनी म्हंटले आहे की,  या जमिनीसाठी आमच्यावर दबाव टाकला. केवळ अतिक्रण काढण्याकरता पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी करायला सांगितली होती . मात्र आम्हाला जमिनीचा एकही पैसा मिळालेला नाही. ज्या ठिकाणी हे व्यवहार झाले त्या ठिकाणी हसीना पारकर हि व्यवहार करत होती. त्या लोकांची साक्ष ईडीकडे आहे. हसीन पारकरला ५५ लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. हजारो कोटी हसीना पारकर म्हणजे दाऊदला गेले. एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकरशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट झाले. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

 

Share