दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

लातूर : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. तसेच इयत्ता बारावी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता नववी व इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना या खेळांडूनी विविध स्तरावरील स्पर्धतील सहभाग विचारात घेवून सन २०२०-२१मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे.
लातूर जिल्ह्यातील पात्र खेळाडू विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी व शिक्षण मंडळाचा क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच फॉरमॅट वापरुन परिपूर्ण प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. १५ मार्च २०२२ आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
Share