गुगल डुडल्सकडून महिला दिनाच्या अनोख्या शुभेच्छा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत गुगलने खास डूडल बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो.

गुगलच्या शुभेच्छांमध्ये महिलांच्या विविध रुपाचे व्हिडीओ बनवले आहेत. यात घरात काम करणाऱ्या महिलेपासून तर मेकॅनिक महिला कार्मचारी यांचे दर्शन घडवले आहे. महिलांच्या या प्रगतीचा आलेख अधिकाधिक वाढला आहे. महिलाच्या हक्कासाठी त्यांचा आदरासाठीचा हा दिवस गुगलने विशेष शुभेच्छा देत सर्व स्तरावरील महिलांना समर्पित केला आहे.

या अॅनिमेटेड डूडलमध्ये एक महिला घराची काळजी घेण्यापासून ते अवकाशापर्यंत सर्व काही कसे हाताळू शकते हे दाखवण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांसमोर आव्हाने उभी राहिली आहेत, ज्यांना त्या उत्तम प्रकारे सामोरे जात आहेत.

Share