भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली – आदित्य ठाकरे

मुंबई : शिवसेनेच्या नेत्यावर धाड सत्र सुरुच आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे. याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की,  भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटू लागल्याचं म्हटलं आहे. “महाराष्ट्रावर आधीही अशी आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणच आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इथे निवडणुका लागतील असं समजलं आणि महाविकास आघाडीची भाजपाला भीती वाटायला लागली, तेव्हापासून हे सुरू आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

“उत्तर प्रदेशात असं केलेलं, हैदराबादमध्ये असंच केलेलं, पश्चिम बंगालमध्ये देखील असंच केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येत आहेत, म्हणून इथेही तसंच करत आहेत. सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या प्रचार यंत्रणाच झालेल्या आहेत. पण महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही. ही तर भाजपाची प्रचार यंत्रणाच आहे. लोकशाही राहिली कुठेय?” असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Share