शरद पवारांनी नुकतच एका सभेत केलेली तीन वेगवेगळी विधाने आणि त्या विधानाच्या बातम्या . त्यातील पहिल विधान आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा गांधी नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष आहे. दूसरं विधान आहे की, पवारांनी त्यांच्या वया विषयी केलेलं , ते म्हणाले की काही जण म्हणताय मी म्हतारा आहे पण अजिबात म्हतारा नाही मी तरूण आहे. आणि तिसर विधान आहे एकदा नाही तर चार वेळा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. पवारांच्या या विधानांची चर्चा तर होणारचं. पवारांनी हि विधाने उस्मानाबादेतील सभेत बोलली आहेत.शरद पवारांना अजूनही वाटत की ते म्हतारे नाहीत , त्यांच्या वयाची वाटचाल आता ८२ वर्षाकडे होत आहे. मात्र पवारांचे नातू रोहित पवार म्हातारे दिसू लागले आहेत. तरीही शरद पवार म्हणतात की म्हतारा नाही , म्हणजे त्यांना अजूनही राजकारणात उलथापालथ करायची आहे.
पवारांचे दूसरं विधान होतं की राष्ट्रवादी गांधी नेहरूंच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे.शरद पवार नेहमी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालत आले आहे. त्यांनी आजपर्यंतच्या राजकारणात या विचारसरणाची प्रसार केला. आणि अचानक उस्मानाबादेतील सभेत त्यांनी म्हंटल की, राष्ट्रवादी पक्ष हा गांधी आणि नेहरुंच्या विचारसरणीचा पक्ष आहे. परंतू यातले गांधी कोण हे अजून गुलदस्त्यात आहे.
तिसरं विधान म्हणजे एकदा नव्हे चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आहे, माझा सारखं जमलयं का कोणाला ? खर तर वस्तुस्थितीनूसार पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. परंतू त्यांचा कार्यकाळ पाहणे महत्वाचे आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ ९३१ दिवसांचा होता. शरद पवार चार वर्षांच्या कालखंडात २४१३ दिवस मुख्यमंत्री राहिले आहेत. पण विलासराव देशमूख शरद पवारांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. २६८१ ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आहेत त्यांनी जवळपास १३ वर्षांपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. वसंतराव नाईक, विलासराव देशमूख आणि या नंतर शरद पवार ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून जास्त कार्यकाळ या पदावर भूषवला आहे.
यात पूर्ण पाच वर्ष कार्यकाळ सांभाळणाऱ्यांमध्ये वसंतराव नाईक यांच्यानंतर हा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे. पवारांना त्यांच्या कार्यकाळात एकदाही पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. पवार १९७८-८० पर्यंत मुख्यमंत्री होते जवळपास दोन वर्ष पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २६ जून १९८८ ते १९९० या कालखंडात ते पून्हा एकदा मुख्यमंत्री बनले होते. ४ मार्च १९९० ते २५ जून १९९१ एक वर्ष तीन महिने ते मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहत होते, या नंतर चौथ्यांदा ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होेते. जेव्हा जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री बनले तेव्हा ते काँग्रेसकडून मिळालेल्या बहूमताच्या जोरावर मुख्यमंत्री बनले होते.
राज्यात शरद पवारांच्या नेतृत्वात निवडणूक लढवला गेली तेव्हा तेव्हा काँग्रेसच खच्चीकरण झालं आहे. काँग्रेसने आणलेल्या बहूमतावर पवार तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यामुळे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून भूषण असलेल्या पवारांना नवीन पटनायक सारखा तरूण नेता भारी पडला आहे. नवीन पटनायक यांचा स्वातःचा पक्ष आहे. त्यांनी कोणत्याही पक्षासोबत युवती केलेली नाही. तसेच मोदींचे गुरु तुम्ही म्हणातात त्याचं मोदींनी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून चार वेळा कामकाज पाहिले आहे. केशूभाई पटेलांच सरकार असताना भाजपच्या बहूमतांवर एकदा आणि स्वबळावर तीन वेळा ते मुख्यमंत्री झाले आहेत.त्यानंतर देशात भाजपला बहूमत मिळवून देत दोन वेळा पंतप्रधान झाले आहेत.
सात आणि आठ खासदारांच्या बळावर कृषीमंत्री पद मिळाल होतं . महाराष्ट्रात कोणताही त्रास नको म्हणून संरक्षण मंत्री झालेले होते. केंद्रातून परत राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेले होते. पवारांमुळे प्रत्येकवेळी काँग्रेसला बहूमत गमावव लागलं होतं. त्यामुळे चार वेळा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ भोगला याचे कोणतेही भूषण नाही.