#BoycottKapilSharmaShow: काय आहे नेमकं कारण?

मुंबई-  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर केलेल्या आरोपांनंतर वाद निर्माण झाला असून सोशल मिडियावरील नागरिक चांगलेच संतापले आहेत. हा वाद इतका वाढला आहे की, सोशल मिडियाव्दारे कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. ट्विटरला सध्या #BoycottKapilSharmaShow हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिगला आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या म्हणण्यानुसार, कपिल शर्माने त्याच्या कार्यक्रमात ‘द काश्मीर फाईल्स’ या आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यास नकार दिला आहे. आपल्या चित्रपटात कोणताही मोठा स्टार अभिनेता नसल्याने कपिल शर्मा शोने कार्यक्रमात प्रमोशन कऱण्याची विनंती फेटाळली असा विवेक अग्निहोत्रींचा आरोप आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या या आरोपांनंतर ट्विटरवर कपिल शर्मा शो ट्रेडिंगमध्ये आहेत. सोशल मिडियावरील नागरिक चॅनेल आणि कपिल शर्माच्या निर्मात्यांवर टीका करत असून प्रमोशन करण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करत आहेत.

Share