महाविकास आघाडी सरकारला दाऊदचा पुळका- नितेश राणे

मुंबई : खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता. शरद पवार यांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका असे आ. नितेश राणे म्हणाले.

महाराष्ट्रात नोटीस मिळणे हे गुड मॉर्निंग मेसेजसारखे झाले आहे. मेसेज येताच नोटीस मिळते असे वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. सत्य बोलल्यावर एफआयआर नोंदवला जातो किंवा नोटीस पाठवली जाते. बॉम्बस्फोटात असणारा आरोपी दाऊद याविषयी आम्ही आमची भूमिका मांडली आहे.महाविकास आघाडीसरकारला दाऊदचा इतका पुळका आहे तर त्यांनी दाऊदला महाराष्ट्र भूषण देऊन टाका. त्याचबरोबर आम्ही काहीही चुकीचे बोललेलो नाही अनिल देशमुख  हिंदु असल्याने त्यांचा राजीनामा घेतला मग नवाब मलिक मुस्लिम असल्याने त्याचा राजीनामा घेतला  का  नाही ? असा सवाल आम्ही उपस्थित केला. आम्ही हिंदू मुस्लीमांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही, तसेच दोन्ही समाजात तेढ निर्माण व्हावे अशी आमची इच्छा देखील नाही.योग्य वेळी आम्ही योग्य उत्तर देऊ असे नितेश राणेंनी सांगितले आहे.

देशाच्या सुरक्षेच्या बाजूने बोलणे हा गुन्हा आहे का? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गोपनीयतेचा भंग केला नाही. मीडियाला कुठून ते व्हिडिओ मिळाले, ते माहित नाही. सरकर घाबरलेलं आहे, सरकार आगीशी खेळत आहे, ते स्वत: जळून खाक होणार आहे असी टीका देखील राणेंनी केली आहे.

नेमकं तक्रारी काय आहे
राणे बंधू नितेश आणि निलेश यांनी जाणीव पूर्वक समाजात तेड निर्माण केला आहे, त्यांनी शरद पवार यांचे आतंरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये वक्तव्य करत आहेत. राणे बंधू यांनी अनिल देशमुख हिंदू आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, असे वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसेच शरद पवार यांचा दाऊदशी संबंध आहे, असे वक्तव्य़ करून शरद पवार याच्या जीवाला धोका निर्माण केला असल्याने राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला दाखल केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांना यांसंदर्भातला पुराव्याचा पेनड्राव्ह दिला आहे.

Share