देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर चौकशी सुरु

मुंबई-  फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणावरून फडणवीस यांना आज बीकेसी येथील सायबर पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. परंतू पोलिस अधिकारी फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत . ३ पोलिस अधिकारी सागर बंगल्यावर आले आहेत. फडणवीस यांची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत हे चौकशीसाठी सागर बंगल्यावर आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची१२ वाजल्यापासून जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.  डीसीपी हेमराजसिंग राजपूत हे जबाब नोंदवून घेत आहेत.

Share