काँग्रेसमध्ये उलथापालथ ! सोनिया-प्रियांका गांधी राजीनामा देण्याची शक्यता ?

दिल्ली-  पाच राज्याच्या निवडणूका पार पडल्या यात काँग्रेसला पाहिजे तसं यश प्राप्त करता आलं नाही. तसेच पंजाबमध्ये असलेली सत्ता अंतर्गत वादामुळे हातातून गेली . त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये मोठ्या हालचालींना वेग आला आहे.  त्याच प्रमाणे काँग्रसेच्या अध्यक्षपदावर गांधी परिवारा व्यतीरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आणि काँग्रेसच्या G 23 नेत्यांनीच आता मुकुल वासनीक किंवा मल्लिकार्जुन खर्गे या दोघांच्या नावाची शिफारस केल्याचं वृत्त सुत्रांकडून समोर आलं आहे.

पाच राज्यांमधील लाजीरवाण्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर प्रसिध्द केलं होतं.   त्यानंतर या चर्चेला अधिक जोर आला होता. या साऱ्या प्रकारानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काही तासांपूर्वी ट्विट करत यावर खुलासा केला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोनिया गांधींचा राजीनामा नको-

काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी सोनिया गांधींच्या राजीनाम्याला नकार दिला आहे.  कारण येत्या काही महिन्यांत पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षाची निवड होणार आहे. मात्र, पक्षाचे विश्वसनीय सूत्र आणि गांधी घराण्याशी विशेष संबंध असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे की, हायकमांडकडूनच मल्लिकार्जुन खर्गे किंवा मुकुल वासनिक यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्याबाबतही चर्चा झाली आहे. रविवारी दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीत सोनिया गांधी यांचा राजीनामा स्वीकारला गेला, तर पुढील पूर्णवेळ अध्यक्ष निवड होईपर्यंत खर्गे किंवा वासनिक यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Share