बहुचर्चित चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आता ओटीटीवर

मुंबईः  संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट, शांतनु, अजय देवगण, विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

https://www.instagram.com/tv/CarlT48AxHk/?utm_source=ig_web_copy_link

रिपोर्टनुसार गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे थिएटरमध्ये आठ आठवडे पूर्ण झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय, चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट २२ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Share