मला गोवण्याचा प्रयत्न फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई-   विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी सागर बंगल्यावर सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास फडणवीसांची चौकशी करण्यात आली आहे .  चौकशीनंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मला राज्य सरकार गोवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर केला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्यात जो बदल्यांचा महाघोटाळा झाला ही सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना पाठवली होती . त्यानंतर सीबीआय चौकशी लागली. या सरकारने याबाबतचा रिपोर्ट दाबून ठेवला होता . तो मी बाहेर काढला आहे . पुढे म्हणाले की,  मला पोलिसांनी जी प्रश्नावली पाठवली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नावलीत फरक होता. मी गोपनीयतेचा भंग केला अशा प्रकारचे प्रश्न मला विचारण्यात आले. कलम 160 नूसार कोणतेही प्रश्न आजच्या चौकशीत नव्हते. त्यामुळे मला या प्रकरणात गोवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप या दरम्यान फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान पोलिसांनी माझा केलेले गोपनीय कागदपत्राच्या भंगाचे आरोप चूकीचे आहेत. माझी चौकशी करण्यापेक्षा नवाब मलिकांची चौकशी करायला हवी त्यांनीच ती कागदपत्रे माध्यमांवर आणली आणि माध्यम प्रतिनिधींना दिली. त्यामुळे राज्य सरकारनेच ठरवायले हवे गोपनीयतेचा भंग कोणी केला ? मी जबाबदार नागरिक म्हणून आज चौकशीला सामोरे गेलो आहे, असं फडणवीस पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले.

राज्यभर आंदोलने-

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या चौकशीच्या नोटीसचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. तसेच भाजपकडून त्या नोटीसीची होळी करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मुंबई येथील त्यांच्या शासकिय निवासस्थाना बाहेर मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्त्ये ,पदाधिकारी उपस्थित होते.

Share