पंजाबमध्ये काँग्रेस अपयशी ; सिद्धूंचा राजीनामा

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काॅॅग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यानुसार पंजाबचे प्रदेशाध्यक्ष  नवज्योत सिंग सिद्धू यांनी  इच्छेनुसार राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी या एका ओळींच्या राजीनान्यात म्हटंल की, दि प्रेसिडेंट, ऑल इंडिया काॅंग्रेस कमिटी, मी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष  पदाचा राजीनामा देत आहे.

दरम्यान पाच राज्यांमध्ये नामुष्कीजनक पराभवानंतर राविवारी काॅँग्रेस कार्यकारिणी समितीची साडेचार तास बैठक झाली होती. यात सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळ्याची तसेच, आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचीही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना पायउतार होण्यास सांगण्यात आले असून या निर्णयाची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी  ट्विटद्वारे दिली.

Share