द काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक-संजय राऊत

नवी दिल्लीः  बहुचर्चीत चित्रपट ‘द काश्मीर फाइल’ चित्रपट सध्या बाॅक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतोय. या चित्रपटावर विविध मतप्रवाह सुरु आहेत. राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. द काश्मीर फाईल्स हा चित्रपट हरियाणा, गुजरात , गोवा , आणि मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत आज दिल्लीमध्ये बोलताना म्हणाले की, काश्मीर फाईल्सचे मोदी हे सर्वात मोठे प्रचारक आहेत. हा एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे. काश्मीरी पंडितांची वेदना देशात बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकी कुणाला माहीत नसेल, असे राऊत म्हणाले.

काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्य दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसते चित्रपट टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असे  टोला राऊत यांनी लगावला आहे .

Share