नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.
भगवंत मान यांनी शहीद भगतसिंह यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी, इश्क करना है तो वतन से करो… असे म्हणत देशभक्तीपर शायरीही ठोकली. इश्क करना सबका पैदाईशी हक है, क्यूंना इस बार वतन की सरजमीं को मेहबुब बना लिया जाए.. असे त्यांनी म्हटले. तसेच, नवनिर्वाचित सर्वच आमदारांना मी आवाहन करतो की, सर्वांचा आदर करा, अरोगंट होऊ नका. ज्यांनी आपणास मतदान केलं नाही, त्यांच्याशीही आदराने वागा, असा सल्लाच नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी आपच्या सर्वच आमदारांना दिला.
Punjab | "Ishq karna sabka paidaishi haq hai kyun na is baar watan ki sarzamin ko mehboob bana liya jaye," says Punjab's new Chief Minister Bhagwant Mann quoting Bhagat Singh after taking oath pic.twitter.com/mWdP6j74Je
— ANI (@ANI) March 16, 2022