राणे पवार आणि दाऊद

राणे कुटुंबावर सध्या राज्य सरकार पेटून उठलं आहे. वाटेल तेव्हा चौकशी, वाटेल तेव्हा अटक असं धोरण सध्या सुरु आहे. सातत्याने राणे कुटुंब एकाच प्रकरणावर बोलताना दिसत आहेत आणि त्याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. राणे परिवाराने शरद पवारांवर आरोप केले आहेत की, पवारांचे संबंध दाऊदशी आहेत . त्यावरून सुडबुध्दीने केलेली ही कारवाई आहे. तसेच त्यांच्यावर हिंदू , मुस्लीम दंगा पेटवून देण्याचे देखील आरोप केलेले आहेत. दाऊदशी संबंध नसताना देखील संबंध जोडल्याचा आरोप आहे. असे अनेक आरोप राणे कुटुंबावर करण्यात आले आहेत.

राणे कुटुंबाकडून पवारांवर कोणते आरोप करण्यात आले हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. शरद पवार आणि दाऊद यांचे संबंधावर बोलणारे राणे हे पहिले आणि नवे नाहीत.यावर याआधी अनेक राजकारण्यांनी भाष्य केले आहेत. त्यात गोपीनाथ मुंडे यांचा नंबर अग्रस्थानी लागतो. N.M.Vhora कमिटी रिपोर्ट लिक झाल्यानंतर हा रिपोर्ट आऊटलूक नावाच्या मासिकाने प्रदर्शिक केला होता. या मासिकात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, शरद पवारांचे दाऊदशी आणि अंडरवल्डशी संबंध आहेत. तसेच पवारांचा आर्थीक व्यवहार देखील झालेला आहे.

एन एम व्होरा हे कोणी नेते होते किंवा कोणते अध्यक्ष होते. एन एम व्होरा हे गृह विभागाचे सचिव होते. हि समिती पाच सदस्यीय होती. या समितीचे काम वेगवेगऴ्या विभागाच्या लोकांकडून अंडरवर्ल्डचे संबंध असलेल्यांची माहिती काढणे . 15 जुलै 1993 साली या समितीची पहिली बैठक पार पडली होती. या समितीने पवारांवर नावासह ठपका ठेवलेला आहे. तसेच दिवंगत नेते अहमद पटेल यांचा देखील उल्लेख आहे. काँग्रेसच्या काळात स्थापन झालेली व्होरा कमिटी त्याच काँग्रेसच्या युतीचे असलेले नेते शरद पवारांवर दाऊदशी असलेले संबंध ठपका रेकाॅर्डवरती ठेवते आहे. तर राणे कुटुंबाने आता केलेल्या आरोपवर गुन्हा दाखल केल्याची प्रक्रिया अजबच आहे. नवाब मलिकांना ईडीने अटक केलेली आहे. जमिनीच्या व्यवहारामुळे अटक केलेली आहे. तीन व्यवहार उघड झाले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंधीत लोकांसोबत केलेला हा व्यवहार आहे.

नवाब मलिक राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीकडून ते मंत्री झालेले आहेत. मलिकांना मंत्री करण्यामागे शरद पवारांचा हात आहे. मलिकांचे टेरर फंडींगचे व्यवहार असतील किंवा ते हसीना पारकरला पैसे देत असेल, तसेच कासकर सोबत व्यवहार असतील आणि तरीही शरद पवारांना मलिकांचा राजीनामा नसेल घ्यायचा तर खरच त्यांचा संबंध दाऊदशी आहे. त्यामुळे राणेंना आरोप का करता येणार नाही. तरीही राणेंवर गुन्हा का दाखल होतो. व्होरा कमिटी नूसार त्यांनी देखील अहवलाता शरद पवारांचे संबंध दाऊदशी असल्याच म्हंटल आहे. अनेक नेत्यांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत असं पवार स्वतः सांगतात. एवढचं नव्हे तर हिंदू मुस्लीम मुद्दा ते काढत आहेत. मुस्लीम असेल तर दाऊदशी संबंध जोडले जातात. असं ही पवार म्हणाले होते. तसेच राजकीय पोळ्या भाजन्यासाठी ते मराठा समाजाचं देखील नाव घेतात त्यामुळे पवार कोणाचाही विषय काढू शकतात आणि तुमचे विषय असेल तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को डाटे.

Share