हरभजन सिंहला ‘आप’कडून ऑफर, प्रमुखपदही देणार असल्याचा चर्चा

पंजाब-  आम आदमी पार्टीने पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे आता पक्षाकडून राज्यसभेत आपले बळ वाढवण्यावर विचार केला जातोय. आपतर्फे माजी क्रिकेकटपटू हरभजन सिंग यांना थेट राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरु आहेत. हरभजन सिंग यांच्याकडे पंजाबमधील प्रस्तावित स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुखपददेखील सोपवले जाण्याची शक्यता आहे.

आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी कोणाला संधी द्यावी यावर आपमध्ये चर्चा सुरु आहे. त्यासाठी पहिले नाव म्हणून हरभजन सिंग यांना निवडण्यात आल्याची चर्चा आहे. हरभजन सिंग यांना आप पक्षाकडून राज्यसभेसोबतच प्रस्तावित असलेल्या स्पोर्ट युनिव्हर्सिटीचे प्रमुख बनवले जाऊ शकते. सध्या आप पक्षाचे राज्यसभेमध्ये नारायणदास गुप्ता, शुशीलकुमार गुप्ता तसेच संजय सिंह असे तीन खासदार आहेत. अजून याबाबत कोणतिही अधिकृत माहिती आपकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपच्या ऑफरला हरभजन स्वाकारेल का हे पाहाणे महत्वाचे ठरेल.

Share