आता तृणमूल काँग्रेस ईडीच्या रडावर, सरचिटणीसाला नोटीस

दिल्ली- ईडीच्या रडारवर महाराष्ट्रानंतर आता पश्चिम बंगाल असल्याचं दिसत आहे. नुकतच ईडीने तृणमूलच्या सरचिटणीसांना व त्यांच्या पत्नींना नोटीस पाठवली आहे.  तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना ईडीने नोटीस पाठवत दिल्ली येथे हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत. नुकतच तृणमूल मधील तीन चार नेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या बाजून आहे अशी टिका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. रुजिरा बॅनर्जी यांनी न्यायालयात ईडीच्या तक्रारीविरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना ईडीला बॅनर्जी पती-पत्नीला नोटीस बजावण्याची परवानगी दिली आहे. तसेच, दिल्लीमध्ये त्यांची चौकशी करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. याआधी ईडीने पश्चिम बंगालचे मंत्री मोलॉय घातक यांना कोळसा घोटाळा प्रकरणात नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे सीबीआयनं तृणमूलचे बिरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रता मोंडल यांना नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कारवाईवर काय म्हणाल्या –

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कारवाईचा निषेध केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम करत आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचं  ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. “सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांचा निर्लज्जपणे वापर सुरू आहे. केंद्र सरकार या यंत्रणांना जे काही सांगतं, ते या यंत्रणा करत आहेत. फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होत आहे. विरोधकांना दाबण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर होऊ शकत नाही”, असं देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

 

Share