मुंबई- राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. यावर शिवसेना नेते यांनी प्रितिक्रिया देत या चर्चा व्यर्थ असल्याचं म्हंटल आहे. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावत यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
फडणवाीस म्हणाले की, भाजपाला हरवण्यासाठी सगळे पक्ष एकत्रित येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोणीही एकत्रित आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातील जनता ही मोदींच्या पाठीशी आहे आणि ती भाजपालाच निवडून देईल. फक्त आता या सगळ्या आघाडीमध्ये शिवसेना काय करणार? याकडे आमचं लक्ष असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच एमआयएमला भाजपाची बी टीम बोललं जात होतं, परंतु आता त्यांच्याशी युती करण्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ते हारले की त्यांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते. हरल्यानंतर अशा अनेक गोष्टी ते बोलत असतात. त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसते.असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे.