औरंगजेबा समोर झुकणारे…एमआयएमच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई- एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युतीची ऑफर दिली आहे, अशा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. यावर महाविकास आघाडीमधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राऊत म्हणाले की, औरंगजेबा समोर झुकणारे हे महाराष्ट्राचा किंवा शिवसेनेचा आदर्श होवू शकत नाहीत. महाविकास आघाडीत तिसरा कोणीही येणार नसल्याचं राऊत म्हणाले आहेत. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे आघाडी पक्ष आहोत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे जाऊन गुढगे टेकतात. त्यामुळे हे नेते महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत. एमआयएम आणि भाजपची युती असल्याचं सर्वांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाहिलं आहे. त्यामुळे ह्या चर्चा व्यर्थ आहेत. असं संजय राऊत पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.

Share