मुंबई- मंगळवारी सभागृहात भाजपाचे सदस्य उपस्थित नव्हते याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही ‘काश्मीर फाईल्स’ बघायला गेलो होतो, डंके के चोटे पे गेलो होतो. आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे असं सांगितलं. यावर संतापलेल्या जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.
काश्मीर फाईल्स हा सिनेमा मध्यांतरानंतर कंटाळवाणा आहे. तुम्ही तो बघायला गेलात यावर म्हणणं नाही, फक्त निर्मात्याकडे १६० कोटी जमा झाले आहेत त्यातून काश्मिरी पंडितांना घरं बांधण्यासाठी दान करायला सांगा, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
Stunned & Speechless!
All pseudo-seculars MUST watch #TheKashmirFiles!
This film not against any caste or religion but a true story about Kashmir.
After watching this film, I once again thank our Hon PM @narendramodi ji for the abrogation of #Article370.@vivekagnihotri pic.twitter.com/9FfSO4NMDo— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 23, 2022
प्रत्येकाने काश्मीर फाईल्स बघायला पाहिजे-
“काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर मी स्तब्ध आणि निशब्द आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहिला पाहिजे. काश्मीरचं सत्य चित्रपटाच्या निमित्ताने समोर आलं आहे. हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात आहे असं मला वाटत नाही. उलट या देशात खोटं चित्र उभं करणाऱ्यांच्या विरोधात हा चित्रपट आहे. कोणत्याही धर्म, जातीचा असलेल्या प्रत्येक देशभक्ताने हा चित्रपट पाहिला पाहिजे. पंतप्रधानांनी ३७० कलम हटवून देशात कोणती क्रांती आणली हे समजून घ्यायचं असेल काश्मीर फाईल्स पाहिला पाहिजे,” असं फडणवीस चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.