दिलासादायक! या महिन्या अखेरीस कोरोना निर्बंध शिथिल होणार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना वरील सर्व निर्बध हटविण्यात येणार आहे. देशात कोरोनाची लाट ओसल्यामुळे ३१ मार्चपासून  सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून  करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग मात्र अनिवार्य असणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे आणि आता दररोज दोन हजारांहून कमी रुग्ण संख्या नोंदवली जात आहेत. यानंतर, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी रद्द केल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, सरकारने जवळपास दोन वर्षांनंतर ३१ मार्चपासून कोविड-१९ शी संबंधित सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात २४ मार्च २०२० रोजी पहिल्यांदा निर्बंध लागू

केंद्र सरकारने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा, (DM कायदा) २००५अंतर्गत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलही केले होते. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यानुसान हे निर्बंध हटविण्यात आले आहेत.

Share