रस्त्यावर उतरून माजी आमदार जाधव यांच भिकमांगो आंदोलन

औरंगाबाद-  मुंबई बाहेर राहणाऱ्या राज्यातील ३०० आमदारांना घरं देण्याच्या निर्णयावरून ठाकरे सरकारवर मोठी टीका होतेय. या भावना सोशल मिडीयाच्या माध्यमातून उमटतांना दिसत आहेत.  तसंच काही राजकीय मंडळींनी देखील याचा निषेध केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही या निर्णयाच्या निषेधात कन्नड येथे भीक मांगो आंदोलन केल आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना भिकेची याचना केली.

दरम्यान पिशोर नाका येथे फिरून त्यांनी भिकेच्या स्वरुपात जमा झालेले पैसे तातडीने मुख्यमंत्र्यांया साहायता निधी पाठवले आहेत. जाधव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षांच्या आमदारांना मुंबईत घरे बांधण्याचा  निर्णय घेवून त्याला मंजूरी देण्यात आली आहे. यावर कोणत्याही पक्षाकडून विरोध करण्यात आला नाही हे विशेष . दुसरीकडे याच अधिवेशनात करवाढीच्या प्रस्ताव सुचवण्यात आला. यात भविष्यात शेतकरी, नोकरदार, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या खिशातून वसुली करण्याचे काम केले जाणार आहे.

दोन वर्षात राज्याची जनता होरपळून निघाली आहे. त्यातच सरकार आमदारांच्या घरांसाठी कर लादणार आहे. हा कर कमी व्हावा सामान्य जनतेच्या खीशाला कमी कात्री बसावी म्हणून आम्ही आतापासूनच नियोजन करत आहोत.त्यामुळे आज भिक मांगो आंदोलन करुन पैसै जमा करण्यात आले. आणि ते पाठवून देखील दिले आहेत. त्यामुळे आता सरकारला विनंती आहे की, कर वाढ न करता आमदारांची घरे बांधू शकता. असे जाधव यांनी यावेळी सांगितले.

Share