मग शिवसेनेसाठी काय? नुसतच गोडगोड सेना नेत्याचं वक्तव्य

महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येणं हे काही नविन नाही. त्यामुळे नुकतच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल यात निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय झाल्याचं दिसून आलं आहे. सेनेला केवळ १६ टक्के रक्क्म विकास कामांसाठी देण्यात आली आहे. तर सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला गेल्या त्यापाठोपाठ काँग्रेसला निधी वाटप करण्यात आला आहे. त्यावरून सेनेत नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच सेनेचे नेते तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तानाजी सावंत यांनी राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसवर एका सभेत जोरदार टिका केली आहे. नुकतच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलेलं आहे. मागील दोन-अडीच वर्षांमध्ये सर्व माध्यमं देखील दाखवत आहेत आणि आम्ही देखील सभागृहाच्या बाहेर बघतोय आणि आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत, मग कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडामधील असतील आमच्या सगळ्यांची मानसिकता एक झालेली आहे. शिवसेनेला कुठंतरी दुय्यम वागणूक मिळत आहे आणि हे अर्थसंकल्पातून देखील प्रतिबिंबित झालेलं आहे. विरोधी पक्षांनी ओरडायचं त्यांचे काम आहे त्यांना ते करू द्या. तथ्य काय आहे तर तथ्य हेच आहे. आज ५७ ते ६० टक्के बजेट हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जातं. जवळपास ३०-३५ टक्के बजेट हे काँग्रेसला दिलं जातं. शिवसेनला १६ टक्के बजेट दिलं जातं. या १६ टक्के बजेट मधलं आज उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री आमचे असल्याने पगारावरतीच सहा टक्के जातं, मग विकासासाठी काय? विकासासाठी केवळ १० टक्के आहे. अशी प्रतिक्रिया सावंत यांनी यावेळी मांडली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, खेदाने व्यक्त करतो माझ्या मतदारसंघात असेल, उस्मानाबाद जिल्ह्यात किंवा सोलापुर, यवतमाळच्या देखील जिल्हाप्रमुक संपर्क प्रमुखांचे मला फोन असतात, की त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील हसन मुश्रीफांकडे जाऊन एक-दीड कोटींची कामे घेऊन येतो आणि आपल्या छाताडावर नाचतो. जे आमदाराला मिळत नाही, खासदाराचा तर विषयच येत नाही आणि मग शिवसेनेसाठी काय? नुसतच गोडगोड. आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा तुम्ही प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. आम्ही सहन करणार, जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत रक्ताचा थेंब आमच्या शरिरात आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू. आमच्या संयमाची तुम्ही अजिबात परीक्षा पाहू नका. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही शांत आहोत. असा इशारा तानाजी सावंत यांनी यावेळी दिला.

Share