मुंबई : राज्यात सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत, शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो. आज मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला हजर रहावे आणि संप मागे घ्यावा, असे आवाहन मंत्री राऊत यांनी केले.
वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही मी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून दिली.@MSEDCL @connectMSPGCL pic.twitter.com/cbIEmFgbkI
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) March 28, 2022
राज्याला सध्या विजेची नितांत गरज असून या परिस्थितीचा फायदा कुणीही घेऊ नये असेही त्यांनी सांगितले. तसेच कृपया कोणत्याही संघटनेने राज्य सरकारला वेठीस धरू नये आणि विरोधकांना संधी उपलब्ध करून देऊ नये असेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीचा विचार करुन ऊर्जा मंत्री राऊत यांनी सांगितले की, एक पाऊल मी पुढे येतो एक पाऊल तुम्ही समोर या असेही अश्वासन त्यांनी दिले.
तसेच महामंडळ खासगीकरणाची जी गोष्ट आहे, त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, खासगीकरण अजिबात कोणत्याही कंपनीचा होणार नसल्याचेही त्यांनी खात्री दिली आहे. यावेळी त्यांनी वीज निर्मितीविषयी सांगताना म्हटले की, या सर्व गोष्टींचा वीज निर्मितीवर निश्चितपणे परिणाम होणार आहे. एकादा प्लांट बंद झाला तर विजेच्या ग्रीडवर त्याचा परिणाम होतो असेही त्यांनी सांगितले. एकलहरे वीज प्रकल्पातील दोन प्लांट बंद झाल्यामुळे नाशिक परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याच्या काळात कोळशाचे मोठे संकट आमच्यापुढे उभा राहिले असून या परिस्थिती कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरणे चुकीचे आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली.