पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

नवी दिल्ली : देशात सलग सातव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोल दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ करण्यात आली आहे.आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर ८४ पैशांची तर डिझेलच्या दरांत ७४ पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल १००.२१ रुपये आणि डिझेल ९१.४७ रुपयांवर पोहोचलं आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील चार महागरांसह इतर शहरात प्रमुख शहरांत पेट्रोल-डिझेल दर वाढवला आहे. मुंबईत सर्वाधिक ८५ पैसे प्रति लीटरने पेट्रोल महागलं आहे. काल सोमवारी पेट्रोल दर ३० पैसे आणि डिझेल ३५ पैसे प्रति लीटर महागलं होतं. आज त्याहून अधिक वाढ झाली आहे. मागील जवळपास आठ दिवसांत इंधन दर ४ रुपयांहून अधिक वाढला आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share