पीटलाईन जालना की औरंगाबाद? खासदार जलील यांचा संसदेत सवाल

दिल्ली –  औरंगाबादच्या पीटलाईनवरून मध्यंतरी बरचं राजकारण पेटलं होतं. भाजपवर बरेच आरोप केले गेले. तसेच जालन्याचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच पीटलाईन जालन्याला पळवली असा आरोप केला गेला. रेल्वे मंत्रालयाकडून पीटलाईन औरंगाबादेत होणार असे सांगितले जाते, तर दुसरकीडे याच मंत्रालयाचे राज्यमंत्री दानवे हे मात्र पीटलाईन ही जालन्यात म्हणजेच आपल्या लोकसभा मतदारसंघातच होणार असे छातीठोकपणे सांगत आहेत.

जलील पुढे म्हणाले की, रेल्वे मंत्री खरंच सांगा, पीटलाईन जालन्यात होणार की औरंगाबादेत? अस म्हणत त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडे विचारणा केली. मराठवाड्यातील केंद्रातील दुसरे मंत्री डाॅ. भागवत कराड यांनी देखील रेल्वे पीटलाईन औरंगाबादेतच होणार असल्याचे अनेकदा जाहीर कार्यक्रमांमधून सांगितले.त्यामुळे भाजपचे हे दोन्ही मंत्री पीटलाईन आपल्याच जिल्ह्यात होणार असा दावा करत आहेत, मग सत्य काय? हे मात्र अजूनही समजू शकलेले नाही. इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत औरंगाबाद शहरातील रेल्वे संदर्भातील दोन प्रमुख मागण्यांवर प्रकाश टाकला. पहिला प्रश्न त्यांनी पीटलाईनच्या संदर्भात उपस्थीत केला. तर दुसरा शिवाजीनगर भागातील रेल्वे भुयारी मार्ग कधी करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

 

Share