वेस्ट इंडिजवर मात करत ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक

आंतरराष्ट्रीय- सध्या महिला विश्व चषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. नुकतच यातून भारत बाहेर पडला आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड , वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका हे संघ खेळणार होते. यातून आता अंतिम फोरीत ऑस्ट्रेलियाने विंडजवर मात करून आपले स्थान निश्चित केले आहे.  हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असून वेस्टइंडिला १५७ धावांनी पराभूत केलं.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मात्र हा निर्णय चुकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ गडी गमवून ३०५ धाव केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १४८ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने १९७८, १९८२, १९८८, १९९७, २००५ आणि २०१३ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. नवव्यांदा ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. अंतिम फेरीतपर्यंतच्या प्रवासात ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही.

ऑस्ट्रेलिया: रेशल हेनस, अलिसा हीली, मेग लन्निंग, बेथ मूने, तहिला मॅकग्राथ, एखले गार्डनर, अनाबेल सथरलँड, जेस जॉनासेन, एलाना किंग, मेगन स्कूट, डार्सी ब्राउन

वेस्ट इंडिज: डिएन्ड्रा डोट्टीन, हेले मॅथ्यू, स्टेफनी टेलर, शेमिनी कॅम्फेल, चेडीन नेशन, कासिया नाईट, चिनले हेन्री, एफी फ्लेचर, अलिया अलेन, अनिसा मोहम्मद, शकेरा सेलमन

Share